
पुरोहित स्वतः आपल्या समोर आहेत.
श्री गणेश चतुर्थी पूजा
वि. सू. : एक पुरोहितच चूकत नसताना एक पूजा विधिवत संपन्न करू शकतो. कुठलही App किंवा Website पुरोहितास पर्याय होऊ शकत नाही. तेव्हा हा WebApp फक्त पुरोहित लाभत नसल्यास वापरणे.
आसनावर बसून हात जोडून मनापासून श्री महा गणपतीची व गुरूंची, माता पितरांची आठवण करणे.
आचमन करणे. ( तीन वेळी पळी भरून पाणी उजव्या हातात घेवून प्या )
एक पळी भर पाणी उजव्या हातात घेवून ताम्हणात सोडा.
हात जोडून देवांचे आठवण करणे.
यजमानाने स्वतःच्या कपाळावर गंध कुंकुम लावून घेणे.
घंटा पूजन : आपल्या समोर घंटा ठेवून त्यावर एक पळी पाणी घाला व एक फूल सहित अक्षता घालून घंटा वाजवा.
भू पूजा : आपल्या समोरील जमीनीवर अक्षता घालून नमस्कार करणे.
आसन पूजा : बसलेल्या आसनावर अक्षता घालून नमस्कार करणे.
दीप पूजा : एक फुलाला हळदी कुंकुम लावून समईवर ठेवून नमस्कार करणे.
हातात अक्षता, फुले, चार दूर्वा धरून हात जोडून देवांचे आठवण करणे. ती फुले फुढील गणेश पूजेवरती घालावी.
पुन्हा अक्षता व तुळशीचे पान डाव्या हातात घेवून एक पळी पाणी घालावे व डाव्या हातावर उजवा हात
झापून
उजव्या
मांडीवर धरा.
चित्र बघा.
आपल्या नांव म्हणून घ्या. आता आम्ही म्हणतो तसं तुम्ही म्हणा.
डाव्या हातात आहे ते अक्षता व तुळशीचे पान उजव्या हातात घेवून पळी भरून पाणी घालून ताम्हणात सोडा.
निर्विघ्न-गणपतीच्या नावाने खालील पूजा विघ्न दूर करण्यासाठी केली जाते. ही गणेशाच्या मूर्तीवर केली जाणारी मुख्य पूजा नाही. ही पूजा आपल्या परंपरेनुसार नारळ, सुपारी किंवा छोट्या मूर्तीवर करायची असते.
हातात अक्षता दूर्वा घेवून निर्विघ्न महा गणपतीची आठवण करणे.
हातात आहे ते अक्षता दूर्वा गणेश पूजेच्या नारळावर घाला.
परत थोड्या अक्षता घेवून गणेश पूजेवर घाला.
तीन वेळा प्रत्येकी पळी भरून उजव्या हातावरून ताम्हणात पाणी सोडा.
एक पळी पाणी घेवून गणेश पूजेच्या नारळावर अभिषेक घाला.
१ कापसाचे वस्त्र व १ जानवी घेवून गणेश पूजेच्या नारळावर ठेवा.
गंध, हळदी-कुंकुम गणेश पूजेच्या नारळाला लावा.
अक्षता, दूर्वा व लाल फुलं गणेश पूजेच्या नारळावर घाला.
अगरबत्ती पेटवा व डाव्या हातात घंटा धरून वाजवत देवाला दाखवा.
गणेश पूजेच्या बाजूला असलेला नैवेद्य दाखवा (केळी किंवा गूळ).
(हातात दूर्वा तुळशी पानेे घेवून एक पळी पाणी घालून
घेणे, नंतर ते
पाणी नैवेद्यावर प्रोक्षण करणे, व डाव्या हात वापरून डोळे बंद करणे, उजव्या हातातून पांच वेळी हात
फिरवून
नैवेद्य
देवाला समर्पण करणे. तुळशी नैवेद्यावर ठेवावी. दूर्वा गणेश पूजेच्या नारळावर ठेवावी.)
प्रत्येकी तीन वेळी पळी भरून पाणी घेवून उजव्या हातावरून ताम्हणात पाणी सोडा.
एक पळी पाणी गणेश पूजेच्या बाजूला ठेवलेले पान सुपाऱ्यावर सोडा
आरत्यावर कापूर पेटवून डाव्या हातात घंटा वाजवत आरती देवाला दाखवा.
एक पळी पाणी घेवून उजव्या हातावरून ताम्हणात सोडा व दोन्ही हातात चार फुले घेवून हात जोडा.
हातात असलेली फुले गणेश पूजेच्या नारळावर घाला आणी नमस्कार करा.
अक्षता हातात घेवून प्रार्थना करणे व गणेश पूजेच्या नारळावर घाला.
हातात अक्षता घेवून गणेश पूजेच्या नारळावर घालून नारळ हलवा.
श्री निर्विघ्न गणेश पूजा झालेली आहे. आता पुढच्या श्री गौरी महादेव सहित श्री महागणपती पूजेसाठी खाली बघा.
अथ कलशपूजा.
पाण्याचा कलश समोर ठेवून घ्या. हातातं अक्षता, दूर्वा व तुळशी घेवून कलशात घाला आणी उजवा हात कलशावर
झाकून
धरा.
कलशाला हळदी कुंकुम लावा.
आता उभे राहून आसन वगैरे काढून ठेवा व पूजा-साहित्य महागणपतीच्या मूर्ती समोर घ्या. गणेश पूजा असलेल्या ताट काढून बाजूला ठेवा. पुढची सगळी पूजा उभा राहून केली जाईल.
मंटप पूजा : हातातं अक्षता घेवून वर्ती बांधलेले माटोळीवर व देवाला बसवलेले मंटपावर घालून नमस्कार करा.
हातातं अक्षता दूर्वा बेलाचे पान आणी फुले धरून श्री महा गणपती व गौरी सहित महादेवाची मनापासून आठवण करणे.
प्राणप्रतिष्ठा. श्री महागणपती मूर्तीच्या छातीवर उजवा हात धरा व मनापासून आठवण करा.
हातातं अक्षता घेवून गणपतीला व गौरी-महादेवाला घाला.
पुनः हातातं अक्षता घेवून गणपतीला व गौरी-महादेवाला घाला.
पळी भर पाणी घेवून देवाच्या पायाकडे घाला.
पळी भर पाणी घेवून देवाच्या हातावर घाला.
पळी भर पाणी घेवून ताम्हणात सोडा.
दोन दूर्वा पाण्यात बुडवून ते दूर्वा वापरून गणपतीला प्रोक्षण करा (शिंपडणे).
पंचामृत विधी :
जर तुम्ही आधीच पंचामृत मिसळले असेल तर प्रत्येक वेळी तेच वापरा.
दोन दूर्वा घेवून देवावर दूध शिंपडावे. नंतर शुद्ध पाणी शिंपडावे.
देवावर दही शिंपडावे. नंतर शुद्ध पाणी शिंपडावे.
देवावर तूप शिंपडावे. नंतर शुद्ध पाणी शिंपडावे.
देवावर मध शिंपडावे. नंतर शुद्ध पाणी शिंपडावे.
देवावर साखर लावावा. नंतर शुद्ध पाणी शिंपडावे.
देवावर गंधमिश्रित पाणी शिंपडावे. नंतर शुद्ध पाणी शिंपडावे. सर्व पंचामृत साहित्य एकत्र करून एका भांड्यात ठेवावे. कापडाने मूर्ती हळूवारपणे स्वच्छ करावे.
अभिषेक करताना श्री गणेश अथर्वशीर्ष मंत्र वापरू इच्छिणार्यानी खालील बटन दाबा.
श्री महा गणपतीला कुंकुम लावलेले कापसाचे १ वस्त्र घाला. तसेच गौरीला १ वस्त्र घाला. महादेवाला पांढरे कापसाचे १ वस्त्र घाला.
१ जानवे सोडून घ्या. पाणी घालून भिजवा व महागणपतीला घाला. जानवे देवाच्या डावी खांद्यावरून
उजव्या
हाताचा खाली
आली
पाईजे. चित्र बघा.
दोन जानवे एकत्र करून महादेवाला (नारळ वर) घाला.
श्री महा गणपतीला गंध, अष्टगंध लावा. महादेवाला पण गंध लावा.
श्री महा गणपतीला शेंदूर लावा.
श्री गौरीला व महागणपतीच्या चरणी हळदी-कुंकुम घाला.
श्री महागणपतीला व गौरी-महादेवाला अक्षता घाला.
श्री महागणपतीला दूर्वा, लाल फुले, गौरीला फुले व महादेवाला बेलाची पाने, पांढरी फुले घाला.
जर २१ प्रकारची पाने उपलब्ध असतील तर ती अर्पण करा. किंवा, बेलाचे पाने अर्पण करा.
मधुमालती > माका > बेलाचे पान > पांढऱ्या दूर्वा > बोरीचे पान > धोतऱ्याचं पान > तुलसीचे पान > शमीचे पान > अघाडा > डोरलीचे पान > कण्हेरीचे पान > रूईचे पान > अर्जुनसादडा > विष्णुक्रांता > डाळिंबीचे आन > देवदारचे पान > पांढरा मरवा > पिंपळाचे पान > जाईचे पान > केवड्याचे पान > अगस्त्याचे पान.
*गणेशाला तुळशी अर्पण केली जात नसली तरी चतुर्थीला वापरता येते
१२ नाम पूजा.
डाव्या हातातं दूर्वा धरून उजव्या हातातंून, गणपतीची आठवण करीत नांवे
घेतात तसे
एक एक
दूर्वा श्री महा गणपतीच्या अंगावर घाला.
१०८ नाम पूजासाठी button दाबा :
हातातं अक्षता घेवून श्री महागणपतीला व गौरी-महादेवाला घाला.
पांच अगरबत्ती पेटवा. व डाव्या हातातं घंटा वाजवत देवानां दाखवा.
एकारती पेटवा व डाव्या हातातं घंटा वाजवत देवानां दाखवा.
नैवेद्य - देवांच्या नैवेद्यासाठी आणलेले सर्व प्रसाद-सामग्री देवाचा समोर ठेवा. ( पंचखाद्य, मोदक, फळे इत्यादी )
हातात दूर्वा, फुले व तुळशी पानेे घेवून एक पळी पाणी घालून घेणे, नंतर ते पाणी नैवेद्यावर प्रोक्षण करणे, व डाव्या हात वापरून डोळे बंद करणे, उजव्या हातातून पांच वेळी हात फिरवून नैवेद्य देवाला समर्पण करणे. तुळशी नैवेद्यावर ठेवावी. फुले व दूर्वा देवाला घालावी.
पळी भर पाणी घेवून प्रत्येकी तीन वेळा उजवा हातातं घेवून ताम्हणात सोडा.
पळी भर पाणी घेवून श्री महागणपतीच्या बाजूला ठेवलेल्या पान सुपाऱ्यावर सोडा. तसेच गौरी - महादेवांच्या बाजूला ठेवलेल्या पान सुपाऱ्यावर एक एक पळी पाणी सोडा.
पंचारती पेटवा व डाव्या हातातं घंटा वाजवत देवांना आरती दाखवा.
कापूराची आरती पेटवा व डाव्या हातातं घंटा वाजवत देवांना आरती दाखवा.
उजवा हातातं पळी भर पाणी घेवून ताम्हणात सोडा. दोन्ही हातातं फुले, दूर्वा, बेलाचे पान धरून अंजलीबद्ध होवून मनापासून देवांना आठवण करा.
देवा समोर आपल्या सभोवती तीन प्रदक्षिणा काढून, साष्टांग नमस्कार करा.
उजव्या हातातं फुले अक्षता धरून, त्या बरोबर एक पळी पाणी घेवून देवाच्या पायांवर सोडा.
प्रार्थना - हातातं फुले घेवून आपल्या मनात आहे ते सर्व प्रार्थना करा. ते फुले देवाला समर्पण करा.
प्रसाद ग्रहण
- देवांच्या पायाकडे असलेले एक एक फुल काढून घ्या, त्याची एक पाखळी
आपल्या
उजव्या
कानावर
ठेवा, आणि राहिलेली फुले इतर कुटुंबीयांना द्या.
आता आसन घेवून बसा. उजवा हातातं अक्षता व फुले घेवून पळी भर पाणी घालून ताम्हणात सोडा.
पुनः आचमन करा.
( तीन वेळा पळी भरून पाणी उजव्या हातातं घेवून प्या )
एक पळी भर पाणी उजव्या हातात घेवून ताम्हणात सोडा.
श्री उमामहेश्वर सहित श्री महागणपतीच्या पूजा संपन्न झाले आहे.
उत्तर पूजेसाठी ह्या button दाबा :
लक्ष्मीपूजन सारख्या इतर उत्सवमध्ये आणि पुढील वर्षीही तुम्हाला या वेबसाइटची आवश्यकता असल्यास, कृपया आम्हाला तुमचा नंबर द्या जेणेकरून आम्ही तुम्हाला त्या वेळी एक लिंक पाठवू शकू.
तुमचा नंबर फक्त लिंक शेअर करण्यासाठी वापरला जाईल.
तुम्ही सेव्ह करू शकता आणि या लिंकला भेट देऊ शकता: https://pooja.online & https://puuja.online
Copyrights reserved.Privacy Terms & Conditions