Me

पुरोहित स्वतः आपल्या समोर आहेत.

श्री गणेश चतुर्थी उत्तर पूजा

आसनावर बसून हात जोडून मनापासून श्री महा गणपतीची व गुरूंची, माता पितरांची आठवण करणे.


आचमन करणे. ( तीन वेळी पळी भरून पाणी उजव्या हातात घेवून प्या )


एक पळी भर पाणी उजव्या हातात घेवून ताम्हणात सोडा.


हात जोडून देवांचे आठवण करणे.


यजमानाने स्वतःच्या कपाळावर गंध कुंकुम लावून घेणे.


अक्षता व तुळशीचे पान डाव्या हातात घेवून एक पळी पाणी घालावे व डाव्या हातावर उजवा हात झापून उजव्या मांडीवर धरा. चित्र बघा.


आपल्या नांव म्हणून घ्या. आता आम्ही म्हणतो तसं तुम्ही म्हणा.


डाव्या हातात आहे ते अक्षता व तुळशीचे पान उजव्या हातात घेवून पळी भरून पाणी घालून ताम्हणात सोडा.


चतुर्थी ला श्री महागणपती पूजेच्या आधी गणेश पूजा म्हणून निर्विघ्न महागणपतीची पूजा केलेली आहे.तसेच, उत्तरपूजेला स्थानपद्धती प्रमाणे थोड्या प्रदेशात गणेश पूजा करतात, थोड्या प्रदेशात नाही. ही पूजा आपल्याकडे सुरु असलेल्या पद्धती प्रमाणे करावी. गणेश पूजा सोडून पुढचे पूजेसाठी हा button दाबा.

हातात अक्षता दूर्वा घेवून निर्विघ्न महा गणपतीची आठवण करणे.


हातात आहे ते अक्षता दूर्वा गणेश पूजेच्या नारळावर किंवा मूर्तीवर घाला.


परत थोड्या अक्षता घेवून गणेश पूजेवर घाला.


तीन वेळा प्रत्येकी पळी भरून उजव्या हातावरून ताम्हणात पाणी सोडा.


एक पळी पाणी घेवून गणेश पूजेच्या नारळावर अभिषेक घाला.


१ कापसाचे वस्त्र व १ जानवी घेवून गणेश पूजेच्या नारळावर ठेवा.


गंध, हळदी-कुंकुम गणेश पूजेच्या नारळाला लावा.


अक्षता, दूर्वा व लाल फुलं गणेश पूजेच्या नारळावर घाला.


अगरबत्ती पेटवा व डाव्या हातात घंटा धरून वाजवत देवाला दाखवा.


गणेश पूजेच्या बाजूला असलेला नैवेद्य दाखवा (केळी किंवा गूळ). ( हातात दूर्वा तुळशी पानेे घेवून एक पळी पाणी घालून घेणे, नंतर ते पाणी नैवेद्यावर प्रोक्षण करणे, व डाव्या हात वापरून डोळे बंद करणे, उजव्या हातातून पांच वेळी हात फिरवून नैवेद्य देवाला समर्पण करणे. तुळशी नैवेद्यावर ठेवावी. दूर्वा गणेश पूजेच्या नारळावर ठेवावी. )


प्रत्येकी तीन वेळी पळी भरून पाणी घेवून उजव्या हातावरून ताम्हणात पाणी सोडा.


एक पळी पाणी गणेश पूजेच्या बाजूला ठेवलेले पान सुपाऱ्यावर सोडा


आरत्यावर कापूर पेटवून डाव्या हातात घंटा वाजवत आरती देवाला दाखवा.


एक पळी पाणी घेवून उजव्या हातावरून ताम्हणात सोडा व दोन्ही हातात चार फुले घेवून हात जोडा. हातात असलेली फुले गणेश पूजेच्या नारळावर घाला आणी नमस्कार करा.


अक्षता हातात घेवून प्रार्थना करणे व गणेश पूजेच्या नारळावर घाला.


हातात अक्षता घेवून गणेश पूजेच्या नारळावर घालून नारळ हलवा.


आता उभे राहून आसन वगैरे काढून ठेवा व पूजा-साहित्य महागणपतीच्या मूर्ती समोर घ्या. गणेश पूजा असलेल्या ताट काढून बाजूला ठेवा. पुढची सगळी पूजा उभा राहून केली जाईल.


हातातं अक्षता दूर्वा बेलाचे पान आणी फुले धरून श्री महा गणपती व गौरी सहित महादेवाची मनापासून आठवण करा व देवाला घाला.


हातातं अक्षता घेवून गणपतीला व गौरी-महादेवाला घाला.


पुनः हातातं अक्षता घेवून गणपतीला व गौरी-महादेवाला घाला.


पळी भर पाणी घेवून देवाच्या पायाकडे घाला.


पळी भर पाणी घेवून देवाच्या हातावर घाला.


पळी भर पाणी घेवून ताम्हणात सोडा.


दोन दूर्वा पाण्यात बुडवून ते दूर्वा वापरून गणपतीला प्रोक्षण करा (शिंपडणे).


श्री महा गणपतीला गंध, अष्टगंध, सिंदूर व कुंकुम लावा. श्री गौरीला हळदी कुंकुम व महादेवाला गंध कुंकुम लावा.


श्री महागणपतीला व गौरी-महादेवाला अक्षता घाला.


श्री महागणपतीला दूर्वा, लाल फुले, गौरीला फुले व महादेवाला बेलाची पाने, पांढरी फुले घाला.


हातातं अक्षता घेवून श्री महागणपतीला व गौरी-महादेवाला घाला.


पांच अगरबत्ती पेटवा. व डाव्या हातातं घंटा वाजवत देवानां दाखवा.


एकारती पेटवा व डाव्या हातातं घंटा वाजवत देवानां दाखवा.


नैवेद्य - देवांच्या नैवेद्यासाठी आणलेले सर्व प्रसाद-सामग्री देवाचा समोर ठेवा. ( पंचखाद्य, गोड, फळे इत्यादी )

हातात दूर्वा तुळशी पानेे घेवून एक पळी पाणी घालून घेणे, नंतर ते पाणी नैवेद्यावर प्रोक्षण करणे, व डाव्या हात वापरून डोळे बंद करणे, उजव्या हातातून पांच वेळी हात फिरवून नैवेद्य देवाला समर्पण करणे. तुळशी नैवेद्यावर ठेवावी. दूर्वा देवाला घालावी.


पळी भर पाणी घेवून प्रत्येकी तीन वेळा उजवा हातातं घेवून ताम्हणात सोडा.


पळी भर पाणी घेवून श्री महागणपतीच्या बाजूला ठेवलेल्या पान सुपाऱ्यावर सोडा. तसेच गौरी - महादेवांच्या बाजूला ठेवलेल्या पान सुपाऱ्यावर एक एक पळी पाणी सोडा.


पंचारती पेटवा व डाव्या हातातं घंटा वाजवत देवांना आरती दाखवा.


कापूराची आरती पेटवा व डाव्या हातातं घंटा वाजवत देवांना आरती दाखवा.


उजवा हातातं पळी भर पाणी घेवून ताम्हणात सोडा. दोन्ही हातातं फुले, दूर्वा, बेलाचे पान धरून अंजलीबद्ध होवून मनापासून देवांना आठवण करा.


देवा समोर आपल्या सभोवती तीन प्रदक्षिणा काढून, साष्टांग नमस्कार करा.


उजव्या हातातं फुले अक्षता धरून, त्या बरोबर एक पळी पाणी घेवून देवाच्या पायांवर सोडा.


प्रार्थना - हातातं नारळ धरा. नारळाची शेंडी देवाचा बाजूला असू दे. आणी आपल्या मनात आहे ते सर्व प्रार्थना करा. त्या नारळ फोडून गणपतीच्या दोन्ही बाजूला ठेवा.


प्रसाद ग्रहण - देवांच्या पायाकडे असलेले एक एक फुल काढून घ्या, त्याची एक पाखळी आपल्या उजव्या कानावर ठेवा, राहिलेल्या फुलांचा वास घेवून ताम्हणात सोडा.


विसर्जन - हातातं अक्षता घ्या. अक्षता देवावर घाला व देवाच्या आसनासहित देवाची मूर्ती उत्तर / पूर्व दिशेकडे हलवा. माटोळी पण हलवा.


आता आसन घेवून बसा. उजवा हातातं अक्षता व फुले घेवून पळी भर पाणी घालून ताम्हणात सोडा.


पुनः आचमन करा. ( तीन वेळा पळी भरून पाणी उजव्या हातातं घेवून प्या )
एक पळी भर पाणी उजव्या हातात घेवून ताम्हणात सोडा.


वर्षपद्धती प्रमाणे या वर्षसुद्धा श्री महा गणपतीची पूजा उत्सव संपन्न झाले आहे.कोणतीही पूजा केल्यानंतर पूजेचे पूर्ण फळ पाप्तीसाठी पुरहिताला दक्षिणा अर्पण करून आशीर्वाद घेण्याची आपली परंपरा आहे. म्हणून शीधा, यथाशक्ति दक्षिणा सहित गणेश पूजेची नारळ व तांदूळ एका ताटात ठेवून तुळसी पान घेवून पाणी सोडणे व आपल्या स्वतःचा पुरोहितांना पोचवावे.


सामान्य लोकांना सठीक मार्गदर्शन नसून पूजा विधी करणे किती कठीण आहे, हा विषय आम्ही स्वतः पुरोहित असून आम्हाला माहिती आहे . म्हणून आम्ही संपूर्ण गणेश पूजा विधी साठीक व User Friendly केलेले आहे . ह्या WebApp बाहेरून किती सरळ दिसले तरी, ह्याच्या मागे कठीण व सुदीर्घ परिश्रम आहे . हा Project ह्याच्या पुढे चालू ठेवण्यासाठी व इतर पूजाविधी सुद्धा लभ्य करण्यासाठी आपल्या पूर्ण सहकार हवा आहे . आपण खालील बटन वापरून UPI ( Google Pay, PhonePe, Paytm ), NetBanking वापरून साहाय्य करू शकतात . आपण दिलेले प्रत्येक रूपया आम्हाला खूप मदत करेल. धन्यवाद.


लक्ष्मीपूजन सारख्या इतर उत्सवमध्ये आणि पुढील वर्षीही तुम्हाला या वेबसाइटची आवश्यकता असल्यास, कृपया आम्हाला तुमचा नंबर द्या जेणेकरून आम्ही तुम्हाला त्या वेळी एक लिंक पाठवू शकू.

तुमचा नंबर फक्त लिंक शेअर करण्यासाठी वापरला जाईल.

तुम्ही सेव्ह करू शकता आणि या लिंकला भेट देऊ शकता: https://pooja.online & https://puuja.online


आपल्या बंधू बांधवांना ह्या WebApp खालील button दाबून Share करा :