पुरोहित स्वतः आपल्या समोर आहेत.
श्री महालक्ष्मीची पूजेसाठी लागणारी सगळी सामग्री खालील प्रमाणे तय्यार करून घ्यावी. आपल्या दुकानांत, पेढींत वगैरे रंग लावून साफसफाई करावी. शक्य असेल त्यप्रमाणे फुलांच्या माळा, तोरणे, आम्रपल्लव, केळीचे खांब इत्यादि प्रकारांनी शोभा आणावी. सरस्वतीपूजनाकरितां स्वतःच्या पद्धतीप्रमाणे जमाखर्चाच्या वह्या, बुके तयार करून त्या सर्वांवर, निदान खतावणी व रोजकीर्द या दोन बुकांवर आरंभी तांबडे कुंकू लावून त्या गंधाने स्वस्तिक चिन्ह काढून त्यापुढे शक, संवत, इसवीसन, वार, नक्षत्र इत्यादि लिहावी आणी शेवठी तांबड्या गंधाने "शुभमस्तु" असे लिहावे. शाईच्या दौती, लेखण्या किंवा टाक स्वच्छ नव्या असाव्या. महालक्ष्मीची फोटो किंवा मूर्ती ( दोनी वापरू शकतो) एक ताटात थोडे पैसे, पूजण्यासाठी. समई ( दोन समई देवीच्या दोन बाजूला पेटवून ठेवा). रांगोळी ( देवी समोर रांगोळी घालावी). एका ताटात - फुले, दूर्वा, तुळशी, गंध, अष्ट गंध, हळद, कुंकुम, अक्षता. जानवी 1 खण देवीला मंगलसूत्र, कांकण, इत्यादी. कापसाची वस्त्र 2 पंचामृत आरत्या ( एकारती, पंचारती, कापूराची आरती ) आसन. ( पाट किंवा चटई ). घंटा. स्वच्छ उदकाने भरलेले तांब्याचे किंवा चांदीचे दोन कलश पंचपात्री (पेला, पळी, पडगा) ताम्हण तांदुळ 2 शेर नारळ 2 सुपर्या, विड्याची पाने फळफळावळ आम्रपल्लव उदबत्ती, कापूर, वाती, फुलवाती, नैवेद्याकरिता बत्तासे, पेढे वगैरे सुटे पैशे अगरबत्ती लावण्यासाठी Stand.
वरील प्रमाणे मांडून झाल्यावर पूजा सुरू करा. त्यासाठी खालील Button दाबा.
ज्या कोणाला पुरोहित अलभ्य असून ( जस विदेशात राहणारे), त्याना पूजाविधी करण्याचा इच्छा आहे, त्यांच्यासाठी ह्या WebApp आम्ही चालवत आहे. ह्या कामात खूप श्रम व खर्च आहे. कुठलीही जाहीरातपासून मुक्त असलेल्या ह्या WebApp चालवण्यासाठी आपल्याकडून होणारे मदत एकमात्र आधार आहे. खालील Button वापरून आपला इच्छानुसार धनसहाय करता येतं.