Me

पुरोहित आपल्या समोर आहे!.

श्री लक्ष्मी पूजा विधान

also available in : हिंदी ಕನ್ನಡ

वि. सू. : एक पुरोहितच चूकत नसताना एक पूजा विधिवत संपन्न करू शकतो. कुठलही App किंवा Website पुरोहितास पर्याय होऊ शकत नाही. तेव्हा हा WebApp फक्त पुरोहित लाभत नसल्यास वापरणे.


आसनावर बसून हात जोडून मनापासून श्री महा गणपतीची व गुरूंची, माता पितरांची आठवण करणे.


आचमन करणे. ( तीन वेळी पळी भरून पाणी उजव्या हातात घेवून प्या )


एक पळी भर पाणी उजव्या हातात घेवून ताम्हणात सोडा.


हात जोडून देवांचे आठवण करणे.


यजमानाने स्वतःच्या कपाळावर गंध कुंकुम लावून घेणे.


घंटा पूजन : आपल्या समोर घंटा ठेवून त्यावर एक पळी पाणी घाला व एक फूल सहित अक्षता घालून घंटा वाजवा.


भू पूजा : आपल्या समोरील जमीनीवर अक्षता घालून नमस्कार करणे.


आसन पूजा : बसलेल्या आसनावर अक्षता घालून नमस्कार करणे.


दीप पूजा : एक फुलाला हळदी कुंकुम लावून समईवर ठेवून नमस्कार करणे.


हातात अक्षता, फुले, चार दूर्वा धरून हात जोडून देवांचे आठवण करणे. ती फुले फुढील गणेश पूजेवरती घालावी.


पुन्हा अक्षता व तुळशीचे पान डाव्या हातात घेवून एक पळी पाणी घालावे व डाव्या हातावर उजवा हात झापून उजव्या मांडीवर धरा. चित्र बघा.


आपल्या नांव म्हणून घ्या. आता आम्ही म्हणतो तसं तुम्ही म्हणा.


डाव्या हातात आहे ते अक्षता व तुळशीचे पान उजव्या हातात घेवून पळी भरून पाणी घालून ताम्हणात सोडा.


स्थळपद्धती प्रमाणे महाराष्ट्र प्रदेशात गणेश पूजेच्या नारळा एवजी गणपतीची लहान मूर्ती वापरली जाते. तसं पण करता येतं.

हातात अक्षता दूर्वा घेवून निर्विघ्न महा गणपतीची आठवण करणे.


हातात आहे ते अक्षता दूर्वा गणेश पूजेच्या नारळावर किंवा मूर्तीवर घाला.


परत थोड्या अक्षता घेवून गणेश पूजेवर घाला.


तीन वेळा प्रत्येकी पळी भरून उजव्या हातावरून ताम्हणात पाणी सोडा.


एक पळी पाणी घेवून गणेश पूजेच्या नारळावर अभिषेक घाला.


१ कापसाचे वस्त्र व १ जानवी घेवून गणेश पूजेच्या नारळावर ठेवा.


गंध, हळदी-कुंकुम गणेश पूजेच्या नारळाला लावा.


अक्षता, दूर्वा व लाल फुलं गणेश पूजेच्या नारळावर घाला.


अगरबत्ती पेटवा व डाव्या हातात घंटा धरून वाजवत देवाला दाखवा.


गणेश पूजेच्या बाजूला असलेला नैवेद्य दाखवा (केळी किंवा गूळ).
(हातात दूर्वा तुळशी पानेे घेवून एक पळी पाणी घालून घेणे, नंतर ते पाणी नैवेद्यावर प्रोक्षण करणे, व डाव्या हात वापरून डोळे बंद करणे, उजव्या हातातून पांच वेळी हात फिरवून नैवेद्य देवाला समर्पण करणे. तुळशी नैवेद्यावर ठेवावी. दूर्वा गणेश पूजेच्या नारळावर ठेवावी.)


प्रत्येकी तीन वेळी पळी भरून पाणी घेवून उजव्या हातावरून ताम्हणात पाणी सोडा.


एक पळी पाणी गणेश पूजेच्या बाजूला ठेवलेले पान सुपाऱ्यावर सोडा


आरत्यावर कापूर पेटवून डाव्या हातात घंटा वाजवत आरती देवाला दाखवा.


एक पळी पाणी घेवून उजव्या हातावरून ताम्हणात सोडा व दोन्ही हातात चार फुले घेवून हात जोडा.

हातात असलेली फुले गणेश पूजेच्या नारळावर घाला आणी नमस्कार करा.


अक्षता हातात घेवून प्रार्थना करणे व गणेश पूजेच्या नारळावर घाला.


हातात अक्षता घेवून गणेश पूजेच्या नारळावर घालून नारळ हलवा.


श्री निर्विघ्न गणेश पूजा झालेली आहे.आता पुढच्या श्री महालक्ष्मीची पूजेसाठी खाली बघा.

अथ कलशपूजा.
कलश समोर ठेवून घ्या. हातातं अक्षता, दूर्वा व तुळशी घेवून कलशात घाला आणी उजवा हात कलशावर झाकून धरा. कलशाला हळदी कुंकुम लावा.


आपल्या पद्धतीप्रमाणे महालक्ष्मीचा फोटो, मूर्ती किंवा कलश पीठावर मांडून घ्या. त्याच्या समोर बसून घ्या.


मंटप पूजा : हातातं अक्षता घेवून देवी बसवलेल्या मंटपावरती घालून नमस्कार करा.


आपल्या दोनी हाताने जमिनीला स्पर्श करावा.


दोनी हात वापरून देवीच्या मंटपावरती ठेवलेला कलश स्पर्श करावा.


हातात अक्षता घेवून कलशावरती घाला, मनात वरूण देवाचे स्मरण करा.


कलशाला गंध, हळदी कुंकू लाऊम फूल घालावे.


पुन्हा दोनी हात वापरून देवीच्या मंटपावरती ठेवलेला कलश स्पर्श करावा.


हातात फुले व अक्षता घेवून मनापासून श्री महाल्क्ष्मीचे स्मरण (ध्यान) करावे. फुले आणि अक्षता श्री महालक्ष्मीला घालावी.


पुन्हा श्री महालक्ष्मीला अक्षता घालावी.


पुन्हा श्री महालक्ष्मीला अक्षता घालावी.


हातात एक फूल घेवून त्याच्यावरती एक पळी पाणी घालून ते फूल श्री महालक्ष्मीला घालावे.


एक फूल घ्या, त्याला गंध लाऊन ते फूल एक पळी पाणी घालून ताम्हणात सोडावे.


उजव्या हातात पळी भर पाणी घेवून पाणी ताम्हणात सोडावे.


एक फूल भिजवून श्री महालक्ष्मीला पाणी प्रोक्षण ( शिंपडणे ) करणे.


फूल किंवा तुळशी घेवून पंचामृतात बुडवून श्री महालक्ष्मीला पाच वेळा प्रोक्षण ( शिंपडणे) करणे. महाल्क्ष्मीची मूर्ती असेलतर एका ताम्हणात मूर्ती ठेवून अभिषेक करणे.


श्री महालक्ष्मीला 'श्री सूक्त मंत्र' वापरून अभिषेक करणे श्रेष्ट आहे. देवीच्या मूर्तीला एक ताम्हणात ठेवून अभिषेक करू शकतो किंवा नमस्कार करून फुढील मंत्र श्रवण करू शकतो. श्री सूक्त मंत्रासाठी खालील बटन दाबा किंवा फुढचा विधान निवडा.


श्री महालक्ष्मीला कापूसाचे वस्त्र घालावे. कलशावर्ती silk अथवा cottonचे इतर वस्त्र असेलतर घालू शकतो. ( खण )


मंगलसूत्र, कांकण किंवा इतर कोणतेही आभरण असेलतर श्री महालक्ष्मीला घालावे. नाहि तर श्री देवीला अक्षता घालावी.


श्री महालक्ष्मीला गंध/ चंदन लावावे.


श्री महालक्ष्मीला अक्षता घालावी.


श्री महालक्ष्मीला फुले व फुलांचे हार घालावे. तुळशीची पाने घालावी.


श्री महालक्ष्मीला 108 नावांचे कुंकुमार्चन किंवा पुष्पार्चन करू शकतो. देवीच्या मूर्तीला एका ताम्हणात ठेवून 108 वेळा कुंकुम अर्चन ( घालणे ) करू शकतो किंवा देवीच्या कलशाला 108 फुलें अर्पण करू शकतो. कुंकुमार्चन झाल्यानंतर देवीची मूर्ती पुन्हा मंटपात ठेवावी. 108 नावांच्या मंत्रासाठी खालील बटन दाबा.


अगरबत्ती पेटवा व डाव्या हातात घंटा धरून वाजवत देवीला दाखवा.


तूपाचे निरंजन पेटवा व डाव्या हातातं घंटा वाजवत देवीला दाखवा.


हातात तुळशी घेवून एक पळी पाणी घालून घेणे, नंतर ते पाणी नैवेद्यावर प्रोक्षण करणे, व डाव्या हात वापरून डोळे बंद करणे, उजव्या हातातून पाच वेळा हात फिरवून नैवेद्य देवीला समर्पण करणे. तुळशीची चार पाने नैवेद्यावर घालावी व उरलेली तुळशी देवीला घालावी.


प्रत्येकी तीन वेळी पळी भरून पाणी घेवून उजव्या हातावरून ताम्हणात पाणी सोडा.


पळी भर पाणी घेवून श्री महाल्क्ष्मीच्या बाजूला ठेवलेल्या पान सुपाऱ्यावर सोडावे.


पंचारती पेटवा व डाव्या हातातं घंटा वाजवत देवीला आरती दाखवा.


कापूराची आरती पेटवा व डाव्या हातातं घंटा वाजवत देवीला आरती दाखवा.


उजवा हातातं पळी भर पाणी घेवून ताम्हणात सोडावे. दोन्ही हातातं फुले धरून हात जोडून देवीला मनापासून नमस्कार करणे. फुले देवीला अर्पण करा.


एक लहान ताटात ठेवलेल्या आभरण किंवा सुट्टे पैसेवर फुलाला गंध कुंकुम लावून अक्षता सहित समर्पण करावे. आणी श्री कुबेर देवाला मनापासून नमस्कार करावे.


आपल्या परिवार समवेत देवीच्या समोर आपल्या सभोवती तीन प्रदक्षिणा काढून, साष्टांग नमस्कार करावे.


उजव्या हातातं फुले अक्षता धरून, त्या बरोबर एक पळी पाणी घेवून देवीच्या पायांवर सोडावे.


तीन वेळी "विष्णवे नमः" असे म्हणावे.


सांगणे : आपल्या परिवार सहित प्रार्थना करावी.


देवीच्या समोर हाताचे ओंजळ ( नमस्कार) करून प्रार्थना करावी. देवीला घातलेल्या फुलांपैकी एक फूल प्रसाद स्वरूप घेणे. त्या फुलाचा वास घेवून आपल्या उजव्या कानावरती ठेवणे.


जर महालक्ष्मीची मूर्ती किंवा कलशाचे नित्य पूजन करत नसल्यास, त्याच्यावर अक्षता घालून विसर्जन करावे. नित्य पूजन करत असल्यास विसर्जन करू नये.


पुनः आचमन करा. ( तीन वेळा पळी भरून पाणी उजव्या हातातं घेवून प्या )
एक पळी भर पाणी उजव्या हातात घेवून ताम्हणात सोडा.


श्री महालक्ष्मीची पूजा संपन्न झालेली आहे.


सामान्य लोकांना सठीक मार्गदर्शन नसून पूजा विधी करणे किती कठीण आहे, हा विषय आम्ही स्वतः पुरोहित असून आम्हाला माहिती आहे . म्हणून आम्ही संपूर्ण गणेश पूजा विधी साठीक व User Friendly केलेले आहे . ह्या WebApp बाहेरून किती सरळ दिसले तरी, ह्याच्या मागे कठीण व सुदीर्घ परिश्रम आहे . हा Project ह्याच्या पुढे चालू ठेवण्यासाठी व इतर पूजाविधी सुद्धा लभ्य करण्यासाठी आपल्या पूर्ण सहकार हवा आहे . आपण खालील बटन वापरून UPI ( Google Pay, PhonePe, Paytm ), NetBanking वापरून साहाय्य करू शकतात . आपण दिलेले प्रत्येक रूपया आम्हाला खूप मदत करेल. धन्यवाद.


To give your feedback or any suggestions, Please click this button.


Copyrights reserved.Privacy Terms & Conditions
×

×