Me

पुरोहित स्वतः आपल्या समोर आहेत.

श्री गणेश चतुर्थी पूजा

श्री महागणपतीच्या पूजेसाठी लागणारी सगळी सामग्री खालील प्रमाणे समोर मांडून घ्या.

  • श्री महागणपतीची मृत्तिका मूर्ती व महादेवाचा नारळ, महागौरीचा कलश. ( आपल्या परंपरेनुसार देवांना मंटपावर मांडून घ्या ).
  • समई. ( दोन समई देवांच्या दोन बाजूला पेटवून ठेवा).
  • रांगोळी ( देवा समोर रांगोळी घालावी).
  • एका ताटात - फुले, दूर्वा-१०८, तुळशी, बेलाचे पान, गंध, अष्ट गंध, सिंदूर, हळद, कुंकुम, अक्षता.
  • जानवी - ४.
  • कापसाची वस्त्र - ४ ( महादेवासाठी १ पांढरे, बाकी कुंकुमयुक्त ).
  • अगरबत्ती, कर्पूर.
  • खायची पाने ३०, सुपार्या ५, सुट्टे पैसे ५ :

    महागणपती समोर २१ पाना & १ सुपारी & पैशे, महादेवाच्या समोर ५ पाना १ सुपारी & पैशे, महागौरी समोर २ पाना १ सुपारी & पैशे ठेवावी.

  • गणेश पूजेसाठी : एक ताट भरून तांदूळ, त्यावर एक नारळ, २ पाना १ सुपारी १ नाणे/पैशे, व १ केळी किंवा गूळ.
  • नारळ १ (उत्तर पूजे दिवशी)
  • फळे.
  • पंचामृत :

    दूध, दही, तूप, मध, साखर

  • पंचपात्र ( पेला, पळी, पडगा, घंटा, कलश भरून पाणी ).
  • आरत्या ( एकारती, पंचारती, कापूराची आरती ).
  • अगरबत्ती लावण्यासाठी Stand.
  • आसन. ( पाट किंवा चटई ).
  • 21 प्रकारची पाने गणपतीला अर्पण करण्याची पद्धत आहे. उपलब्ध असल्यास, हे सर्व गोळा करा :

    मधुमालती, माका, बेलाचे पान, पांढऱ्या दूर्वा, बोरीचे पान, धोतऱ्याचं पान, तुलसीचे पान, शमीचे पान, अघाडा, डोरलीचे पान, कण्हेरीचे पान, रूईचे पान, अर्जुनसादडा, विष्णुक्रांता, डाळिंबीचे आन, देवदारचे पान, पांढरा मरवा, पिंपळाचे पान, जाईचे पान, केवड्याचे पान, अगस्त्याचे पान.

    *गणेशाला तुळशी अर्पण केली जात नसली तरी चतुर्थीला वापरता येते

  • उत्तरपूजे दिवशी शिधा. (1 नारळ, तांदूळ, दाळ, गोड, बाजी, पान - सुपारी)
वरील सामग्री मांडावळीसाठी खालील चित्र बघा.



वरील प्रमाणे मांडून झाल्यावर पूजा सुरू करा. त्यासाठी खालील Button दाबा.




सामान्य लोकांना सठीक मार्गदर्शन नसून पूजा विधी करणे किती कठीण आहे, हा विषय आम्ही स्वतः पुरोहित असून आम्हाला माहिती आहे . म्हणून आम्ही संपूर्ण गणेश पूजा विधी साठीक व User Friendly केलेले आहे . ह्या WebApp बाहेरून किती सरळ दिसले तरी, ह्याच्या मागे कठीण व सुदीर्घ परिश्रम आहे . हा Project ह्याच्या पुढे चालू ठेवण्यासाठी व इतर पूजाविधी सुद्धा लभ्य करण्यासाठी आपल्या पूर्ण सहकार हवा आहे . आपण खालील बटन वापरून UPI ( Google Pay, PhonePe, Paytm ), NetBanking वापरून साहाय्य करू शकतात . आपण दिलेले प्रत्येक रूपया आम्हाला खूप मदत करेल. धन्यवाद.



Copyrights reserved.Privacy Terms & Conditions